Join us
Daily Top 2Weekly Top 5

पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांचं मालिकेच्या सेटवर जंगी स्वागत, कलाकारांकडून जोरदार सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:28 IST

अशोक सराफ सध्या कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसत आहेत. या मालिकेच्या सेटवर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अभिनयाचे सम्राट अशोक सराफ (Ashok Saraf)  यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला या उंचीवर पोहोचलेलं पाहून अनेक मराठी प्रेक्षक आज सुखावले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अशोक सराफ यांचे जुने मराठी चित्रपट आले. प्रत्येक सिनेमा, नाटकात त्यांनी अभिनयाची छाप पाडली आणि इतकी वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अशोक सराफ सध्या कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसत आहेत. या मालिकेच्या सेटवर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

'अशोक मा.मा.' मालिकेच्या सेटवरील सर्वांनी खास पद्धतीने अशोक सराफ यांचा सत्कार केला. 'पद्मश्री अशोक सराफ' असं लिहिलेला केक आणण्यात आला होता. सर्वांसमोर त्यांनी केक कापला. यावेळी ते आभार व्यक्त करत म्हणाले, "नमस्कार, जी गोष्ट साध्य करायला लोकांना फार वेळ लागतो किंवा कधी कधी साध्यही होत नाही ते सगळं मी तुमच्यामुळे साध्य करु शकलो. त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे.  असेच नेहमी माझ्याबरोबर राहा मी चांगलं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद."

अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान

२७ मे रोजी अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. 

टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेतापद्मश्री पुरस्कार