Join us

निवेदीता सराफ यांच्यानंतर 'भाग्य दिले तू मला'मध्ये अशोक मामांची एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:26 IST

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील काकू-बोक्याची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडते.

भाग्य दिले तू मला (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील काकू-बोक्याची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडते. तसंच रत्नमालाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, तन्वी मुंडले, आणि अभिनेता विवेक सांगळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मात्र मालिकेत नवी एन्ट्री होणार आहे. निवेदिता सराफ यांच्यानंतर आता मालिकेत अभिनेते अशोक सराफ यांची एन्ट्री होणार असल्याचा अंदाज लावला जातोय. हा अंदाज नुकताच विवेकने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे लावला जात आहे. 

विवेक सांगळे याने अशोक मामा आणि तन्वीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत विवेकने कॅप्शनमध्ये Caption ची गरजच नाही…!!! असं लिहिलंय. लवकरच मालिकेत एक मनोरंजक ट्रॅक दाखवला जाणार आहे. या नव्या ट्रॅकसाठी अशोक मामांची मालिकेत एन्ट्री होणार असल्याचा अंदाज लावला जातोय. या वृत्ताला अद्याप त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही. 

भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांना पहिल्या प्रोमोपासूनच आवडली आहे. राजवर्धन आणि कावेरी ही जोडी सध्या सगळीकडेच ट्रेंडिंग आहे. या दोघांनाही मिळून #rajveri असं हॅगटॅगही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. ऑनस्क्रिन तर ही जोडी प्रेक्षकांना आवडते आहे पण ऑफस्क्रिन सुद्धा या जोडीला चाहत्यांची बरीच पसंती मिळतेय. सोशल मीडियावर विवेक आणि तन्वी बरेचशे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ