Join us

video: अशोक मामांनी स्वतःच्या हातानं घडवली इको-फ्रेंडली शाडूची गणेशमूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:28 IST

गणेशोत्सव जवळ आला की प्रत्येक घरात बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू होते.

 Colours Marathi Serial: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेतही लाडक्या गणरायाचं वाजतगाजत आगमन होणार आहे. मालिकेची टीम एकत्र येऊन गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन करणार आहे. या विशेष भागात बच्चे कंपनीसोबत अशोक मामा. गणरायाची इको-फ्रेंडली मूर्ती घडवताना पाहायला मिळतील. 

महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ सध्या 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'अशोक मा. मा.' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेतील त्यांच्या पात्राला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतंय. आता या मालिकेत  गणपती विशेष भाग पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय.

ज्यात दिसतं की, सोसायटीत इको-फ्रेंडली मूर्ती घ्यावी की पीओपी यावरून वाद होतो. अशोक मामा हे पीओपी मुर्तीच्या विरोधात असतात. पण, कमी वेळात शाडूची मुर्ती कुठे मिळणार असा प्रश्न सोसायटीमधील लोकांना पडतो. त्यावेळी भैरवीला कळतं की, अशोक यांना स्वतः मूर्ती बनवण्याचा जुना छंद आहे. ती मुलांच्या मदतीनं त्यांना पुन्हा हात मातीला लावण्यासाठी प्रोत्साहित करते.

मालिकेच्या आगामी भागात अशोक मामा मुलांच्या मदतीने इको-फ्रेंडली मूर्ती बनवताना दिसतील. आपल्या जुन्या छंदाला पुन्हा उजाळा देत ते अत्यंत सुंदर मूर्ती साकारतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सोसायटीतील वादावर तोडगा निघतो आणि अखेर यावर्षीची गणपती मूर्ती अशोक मामांच्या हाताने घडवली जाते. त्यामुळे आगामी भाग पाहणे कमालीचे ठरणार आहे. ही मालिका तुम्ही दररोज रात्री ८:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

टॅग्स :अशोक सराफटेलिव्हिजन