Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ज्योतिष असल्याची बतावणी करत अशोक खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. त्याने केवळ महिलांवर अत्याचारच केले नाहीत तर त्याच्याकडे येणाऱ्यांची आर्थिक फसवणूकही केली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर अशोक खरातवर संताप व्यक्त केला जात आहे. काही सेलिब्रिटींनीही अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर यानेदेखील फेसबुकवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
श्रमेशने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये त्याचं रोखठोक मत मांडलं आहे. "साप म्हटलं की चावणारच. त्यामुळे समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा आपण आपला मेंदू गहाण ठेवतो का? आपण स्वत:ला गंडवून का घेतो? याचा शोध घेणे जास्त गरजेचे आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली असून चाहत्यांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.
खरातने भविष्य सांगण्याचे आमिष दाखवून १५० पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ८ गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी ७ गुन्हे हे थेट महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. गुन्हा दाखल केलेल्या ७-८ महिलांशिवाय इतर अनेक पीडित महिला अद्याप सामाजिक भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत. अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचेही आरोप आहेत. अनेक नेत्यांनीही त्याची भेट घेतल्याचं समोर आवं आहे. अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
Web Summary : Actor Shramesh Betkar reacted to Ashok Kharat's fraud and sexual exploitation case. He urged people to use their brains rather than blaming fraudsters, highlighting the importance of self-awareness. Kharat is accused of exploiting over 150 women.
Web Summary : अभिनेता श्रमेश बेटकर ने अशोक खरात के धोखाधड़ी और यौन शोषण मामले पर प्रतिक्रिया व्यक्त की। उन्होंने लोगों से धोखेबाजों को दोष देने के बजाय अपने दिमाग का उपयोग करने का आग्रह किया, आत्म-जागरूकता के महत्व पर प्रकाश डाला। खरात पर 150 से अधिक महिलाओं का शोषण करने का आरोप है।