Join us

आशिष चंचलानीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाला, "मला आणि कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेची गरज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:25 IST

आशिष चंचलानीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याच्या कमबॅकची विनंती केली आहे.

युट्यूबर आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्या मजेशीर कंटेंटचे अनेक लोक चाहते आहेत. नुकत्याच झालेल्या रणवीर अलहाबादियाच्या वादात आशिष चंचलानीही अडकला होता. 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये आशिष स्वत: अलाहाबादियाच्या बाजूला बसला होता. त्या एपिसोडनंतर सर्वांनाच पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. आशिष चंचलानीलाही बोलवण्यात आलं होतं. त्या सर्व वादानंतर आता आशिषने पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आहे.

आशिष चंचलानीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणतो, "हॅलो मित्रांनो, कसे आहात. मला माहितीये..मी तुमचे मेसेज वाचले. तुमच्याशी बोलायचं म्हणून स्टोरी ठेवली पण वाटलं की काय बोलू कळत नव्हतं. या परिस्थितीशीही लढूया. अशी वाईट परिस्थिती आधीही पाहिली आहे. यातूनही काहीतरी नवीन शिकूया. माझी एकच विनंती आहे मला आणि माझ्या कुटुंबाला कायम तुमच्या प्रार्थनेत ठेवा. जेव्हा मी परत येईन, माझं काम इकडे तिकडे झालं आहे तर पाठिंबा द्याल. मी मेहनत घेईनच. मी नेहमीच मेहनत घेतली आहे. बस..काळजी घ्या."

आशिष चंचलानीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याच्या कमबॅकची विनंती केली आहे. तसंच 'तुझी काहीच चूक नव्हती' असंही काही जण म्हणत आहेत फराह खाननेही कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे रणवीर अलाहाबादियाला न्यायालयाने दिलासा दिला असून त्याला पुन्हा पॉडकास्ट सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडिया