Join us

कहानी में ट्विस्ट! अरुंधती राहणार संजनाच्या जुन्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 19:01 IST

Aai kuthe kay karte: अलिकडेच अरुंधती तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे. अरुंधतीने तिच्या ऑफिस शेजारीच भाड्याने घर घेतलं आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत अलिकडेच आत्मसन्मानापोटी अरुंधती देशमुखांच्या घरातून बाहेर पडली आहे. अनिरुद्ध, संजना आणि कांचन यांनी अरुंधतीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर तिने या घरातून काढता पाय घेतला. इतकंच नाही तर आता ती नव्या घरात राहू लागली आहे. मात्र, तिच्या या नव्या घराचं आणि संजनाच्या जुन्या घराचं एक खास कनेक्शन आहे.

अलिकडेच अरुंधती तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे. अरुंधतीने तिच्या ऑफिस शेजारीच भाड्याने घर घेतलं आहे. त्यामुळे आता ती तिच्या हक्काच्या घरात जाणार आहे जेथून तिला कोणीही बाहेर काढू शकणार नाही. विशेष म्हणजे तिच्या या नव्या घराचं आणि संजनाचं जुनं घर यांच्यात एक साम्य असल्याचं समोर आलं आहे.

अरुंधती आता नव्याने राहत असलेल्या घरात प्रथम संजना राहत होती. फक्त या घराचं इंटेरिअर चेंज करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही घरं एकच असल्याचं नेटकऱ्यांनी बरोबर ओळखलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनरुपाली भोसलेमधुराणी प्रभुलकर