Join us
Daily Top 2Weekly Top 5

३४ वर्षांचा वनवास संपला, 'सियाराम' अरुण गोविल-दीपिका चिखलिया पुन्हा एकत्र दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 12:09 IST

एका आगामी प्रोजोक्टसाठी दोघांनी केलेले फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टेलिव्हिजनवरील राम सीता म्हणून प्रसिद्ध असलेली अरुण गोविल (Arun Govil) आणि दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांची सुप्रसिद्ध जोडी आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. त्यांनी साकारलेल्या राम सीतेच्या भूमिकेमुळे लोक खरंच त्यांच्यात राम-सीता बघू लागले होते. दोघांना मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता तब्बल 34 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

34 वर्षांपूर्वी रामायण मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया पुन्हा पडद्यावर येत आहेत. एका आगामी प्रोजोक्टसाठी दोघांनी केलेले फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावरुन एक सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्या गृहिणीच्या भूमिकेत दिसत आहेत.

या व्हिडिओत दीपिका यांनी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि त्या तुळशी वृंदावनाची पूजा करताना दाखवले आहे. तर आणखी एका सीनमध्ये त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्क्रीप्ट वाचत आहेत. तर एका सीनमध्ये अरुण गोविल आणि दीपिका यांचा बीटीएस व्हिडिओ आहे.

दोघांचा हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. युझर्स कमेंट करत त्यांना आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत. 'क्या बात है, राम-सीता फिर एक बार साथ मे' अशी कमेंट चाहत्याने केली आहे. आता दोघांच्या या नव्या प्रोजेक्टची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र हा प्रोजेक्ट नेमका काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :टिव्ही कलाकाररामायण