Join us

ए.आर.रेहमान म्हणतो हा संगीतकार आहे तरुणपिढीचा युथ आयकॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 15:23 IST

ए. आर. रेहमान या कार्यक्रमात सुपरगुरुच्या भूमिकेत दिसणार आहे.  गायक अदनान सामी, हर्षदीप कौर, पॉप गाण्यांची सम्राज्ञी कनिका कपूर आणि अरमान मलिक हे प्रशिक्षकची (परीक्षक) जबाबदारी पार पाडत आहेत. 

ठळक मुद्दे या शोच्या माध्यमातून लवकरच भारताच्या नव्या गायकाचा शोध घेतला जाणार आहे३ फेब्रुवारी 'द व्हॉइस’ शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

स्टार प्लसवरील बहुप्रतीक्षित ‘द व्हॉइस’ या आगामी कार्यक्रमाच्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. ए. आर. रेहमान या कार्यक्रमात सुपरगुरुच्या भूमिकेत दिसणार आहे.  गायक अदनान सामी, हर्षदीप कौर, पॉप गाण्यांची सम्राज्ञी कनिका कपूर आणि अरमान मलिक हे प्रशिक्षकची (परीक्षक) जबाबदारी पार पाडत आहेत. 

अरमान मलिकची स्तुती करताना रहमान म्हणाला, “अरमान मलिक हा आजच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक आहे. त्याच्या गुणांना तोडच नाही आणि तो इतका वैविध्यपूर्ण आहे की तो कोणत्याही प्रकारच्या गाण्याला पूर्ण न्याय देऊ शकतो. तो खरोखरच आजच्या तरुणांचा संगीत आयकॉन आहे.” ए. आर. रेहमान अरमान मलिकचे वडिल संगीतकार आणि गायक डब्बू मलिकला यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.यामुळे अरमानला एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी आपल्याला या कार्यक्रमात बोलावून ए. आर. रेहमानसमोर आपले गाणे सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आपला मुलगा आणि या कार्यक्रमातील एक प्रशिक्षक अरमानचे आभार मानले.  

आता हे सगळं आपल्याला ३ फेब्रुवारीपासून पाहता येणार आहे. ३ फेब्रुवारी 'द व्हॉइस’ शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या माध्यमातून लवकरच भारताच्या नव्या गायकाचा शोध घेतला जाणार आहे.

टॅग्स :द व्हॉइस शोए. आर. रहमान