Rise and Fall Winner: सलमान खानच्या 'बिग बॉस १९' या रिअॅलिटी शोला टक्कर देणारा आणि अश्नीर ग्रोव्हरने होस्ट केलेला रिअॅलिटी शो 'राईज अँड फॉल' (Rise and Fall) चा आज अंतिम सोहळा पार पडला. अभिनेता अर्जुन बिजलानी या शोचा विजेता बनला. शोमध्ये धनश्री वर्मा, अरबाज पटेल, कुब्रा सैत, कीकू शारदा असे अनेक स्पर्धक होते. सर्वांवर मात करत अर्जुनने शो जिंकला. त्याला ३० लाख प्राईज मनीही मिळाली. बाहेर आल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली.
स्ट्रेसफुल प्रवास होता पण...
अर्जुन बिजलानी म्हणाला, "हा प्रवास खूपच स्ट्रेसफुल होता. मनाच्या शांततेसाठी मी बायको आणि मुलाचा फोटो पाहायचो. मला त्यांच्याकडे बघून बळ मिळायचं. सोबतच माझा गणपती बाप्पावर विश्वास होता. मी रोज सकाळी उठून बाप्पाचं नाव घ्यायचो. तसंच मला पश्चात्ताप होईल असं काहीही न वागण्याचं वचन मी स्वत:लाच दिलं होतं. आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी या शोचा विजेता म्हणून बाहेर आलो आहे आणि माझ्या मनात याबद्दल थोडीही शंका नाही."
तो पुढे म्हणाला, "मी हा खेळ अगदी मनाने खेळलो आहे. मी कोणत्याही आव्हानाला स्ट्रॅटेजीने उत्तर द्यायचो. मी जसा आहे तसाच या पूर्ण खेळात राहिलो. बोलतोय एक आणि करतोय वेगळंच असं मी कधी केलं नाही. हीच कदाचित माझी सर्वात मोठी ताकद होती. मी प्रामाणिकपणे खेळलो. या शोने मला एक स्ट्राँग व्यक्ती बनवलं. प्रत्येक दिवशी एक नवीन आव्हान, धडा आणि पुढे जाण्याचं नवीन कारण मिळत गेलं."
Web Summary : Arjun Bijlani emerged victorious in 'Rise and Fall', beating other contestants. He secured a ₹30 lakh prize. Bijlani described the journey as stressful, relying on family photos and faith for strength. He emphasized his honest gameplay and personal growth throughout the show.
Web Summary : अर्जुन बिजलानी 'राइज़ एंड फ़ॉल' में विजयी हुए, अन्य प्रतियोगियों को हराया। उन्होंने ₹30 लाख का पुरस्कार जीता। बिजलानी ने यात्रा को तनावपूर्ण बताया, परिवार की तस्वीरों और विश्वास पर भरोसा किया। उन्होंने शो के दौरान अपने ईमानदार खेल और व्यक्तिगत विकास पर जोर दिया।