Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ : घरातल्या शाब्दिक वादाचं रुपांतर आता हाणामारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 15:02 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाचं नातं कोणाशी कधी बदलेल याचा नेम नाही. आज एका सदस्याबरोबर चांगल असेलल नात कोणत्या करणाने आणि कसे दुसऱ्या दिवशी बदलेल हे सांगता येत नाही.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाचं नातं कोणाशी कधी बदलेल याचा नेम नाही. आज एका सदस्याबरोबर चांगल असेलल नात कोणत्या करणाने आणि कसे दुसऱ्या दिवशी बदलेल हे सांगता येत नाही. हीना आणि नेहा शिवानी येण्याआधी खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या. पण अचानक शिवानीच्या येण्याने हे नात बदललं. हीनाने  नेहाला नॉमिनेट करणे, हीना आणि नेहामध्ये भांडण होणे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण, या घरामध्ये कोणी तुमच्यासोबत असो वा नसो तुम्हाला खंबीर बनून उत्तर द्यावच लावत. काल हीनाने नेहाला तिच्या नवऱ्याने दिलेले पत्र लपवले. ते का लपवले ? आणि ती कधी परत देणार ? हे तीच तिलाच माहिती. आज घरामध्ये हीना आणि शिवानी मध्ये भांडण होणार आहे.

शिवानीने अचानक बाथरूम मध्ये जाऊन हीनाच्या अंगावर पाणी ओतले. यावरून तुम्हाला काही तरी आठवल असेलचं. असेच शिवानीने परागच्या बाबतीत देखील केले होते. आणि हीनाने देखील तिला हेच म्हटले, “जे परागबरोबर केलसं तेच केलसं माझ्यासोबत.” आता बघूया पुढे काय होते. शिवानी असं का वागली ? हीना शिवानी आणि नेहाला काही बोली का ? हे आजच्या भागामध्ये कळेलच.

टॅग्स :बिग बॉस मराठीशिवानी सुर्वेहिना पांचाळ