Join us

"तुझा घटस्फोट झाला आहे का?", नेटकऱ्याचा प्रश्न वाचून जुई गडकरीने लावला डोक्याला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 10:06 IST

Jui Gadkari : जुई गडकरीने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतले. यावेळी चाहत्यांनी तिला खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. त्यात तिला पहिली कमाई, पहिले क्रश, आई-बाबांचा फोटो शेअर कर, तुझं वय काय, लग्न कधी करणार असे अनेक प्रश्न विचारले.

'पुढचं पाऊल' मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी घराघरात लोकप्रिय झाली. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेत काम करताना दिसते आहे. जुई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच त्यांच्याशी संवाद साधत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतले. त्यावेळी चाहत्यांनी तिला खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न पाहून अभिनेत्रीनं डोक्याला हात लावला. 

जुई गडकरीने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतले. यावेळी चाहत्यांनी तिला खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. त्यात तिला पहिली कमाई, पहिले क्रश, आई-बाबांचा फोटो शेअर कर, तुझं वय काय, लग्न कधी करणार असे अनेक प्रश्न विचारले. मात्र, या सगळ्यात एका नेटकऱ्याचा प्रश्न वाचून अभिनेत्रीने डोक्याला हात लावला. 

या नेटकऱ्याने जुईला तुझा घटस्फोट झाला आहे का? असे विचारले. त्यावर अभिनेत्रीने म्हटले, अहो, आधी लग्न तर होऊ द्या. या उत्तरासोबत तिने हसणारी स्माइली आणि डोक्याला हात लावणाऱ्या महिलेचा स्टिकर शेअर केला आहे. जुईने या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

वर्कफ्रंट..

 

जुई गडकरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी तिने "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे.  शिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. 

 

 

टॅग्स :जुई गडकरी