Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्चना पूरन सिंगला हवंय नवज्योत सिंग सिद्धू एवढे मानधन, व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:08 IST

अर्चनाने बोलता बोलता सिद्धूच्या तुलनेत तिला खूप कमी मानधन मिळत असल्याची खंत व्यक्त केली.

कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूच्या जागेवर कॉमेडीयन अर्चना पूरन सिंगची वर्णी लागली आहे. मात्र सध्या या शोची टीआरपी कमी होत चालली आहे. घसरत्या टीआरपीचे कारण सिद्धू असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान नवज्योत सिंग सिद्धूच्या जागी आलेली अर्चना पूरन सिंगने शोमध्ये अशी गोष्ट बोलली ज्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. अर्चनाने बोलता बोलता सिद्धूच्या तुलनेत तिला खूप कमी मानधन मिळत असल्याची खंत व्यक्त केली.

कपिल शर्मा शोच्या आताच्या भागात जॉन अब्राहम आणि मौनी रॉय यांनी हजेरी लावली होती. ते त्यांचा आगामी सिनेमा रोमियो, अकबर आणि वॉल्टर यांच्या प्रमोशनसाठी पोहचले होते. याच भागात अर्चना पूरन सिंह हिने बोलता बोलता कमी मानधनाबाबत खंत व्यक्त केली. कपिल शर्मा हा शोमधील पाहुणे जॉन आणि मौनी यांना अनेक प्रश्न विचारत होता. यावेळी अचानक कपिल शर्माने अर्चनाला प्रश्न विचारला की, जर तुला सुपर पॉवर मिळाली तर तू काय करशील? याच प्रश्नाला उत्तर देताना अर्चना म्हणाली की, 'मला नवज्योत सिंग सिद्धू व्हायचे आहे.' तिने पुढे सांगितले की, 'मी तेच काम करते आहे जे सिद्धूजी करायचे पण, मला तेवढे मानधन मिळत नाही. नवज्योत सिंग सिद्धू झाल्यानंतर किमान मला जास्त मानधन तरी मिळेल. 

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, द कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांनी अर्चनासोबत फक्त २० भागांसाठी करार केला आहे. या शोचे निर्माते सिद्धू वादात अडकला होता, तो वाद शांत होण्याची वाट पाहत आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :द कपिल शर्मा शोकपिल शर्मा नवज्योतसिंग सिद्धू