Join us

'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:29 IST

आरजे महावश आणि युजवेंद्र चहलबद्दल काय बोलले अरबाज आणि धनश्री?

'राइज अँड फॉल' (Rise and Fall) या नव्या रिएलिटी शोची सध्या चर्चा आहे. या शोमध्ये अर्जुन बिजलानी, अरबाज पटेल, कीकू शारदा, पवन सिंह, कुब्रा सैत, धनश्री वर्मा असे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.'शार्क्स टँक'फेम अशनीर ग्रोवर या शोचा होस्ट आहे. शोमधील अनेक क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातल्याच एका व्हिडिओत अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि धनश्री वर्माचं (Dhanashree Verma) संभाषण चर्चेत आहे.

अरबाज पटेल हा निक्की तांबोळीचा बॉयफ्रेंड आहे. दोघंही 'बिग बॉस मराठी ५'मुळे चर्चेत आले. तर धनश्री वर्मा युजवेंद्र चहलशी घटस्फोटामुळे चर्चेत होती. अरबाज आणि धनश्री सध्या 'राइज अँड फॉल'मध्ये दिसत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये अरबाज धनश्रीला म्हणतो, 'तो आता जिच्यासोबत आहे तिला मी खूप चांगलं ओळखतो.' यावर धनश्री म्हणते, 'जाऊदे मला त्याविषयी काही बोलायचं नाही'. पुढे अरबाज म्हणतो, 'नाही मी असं ऐकलं की तू धोका दिला होतास'. धनश्री म्हणते, 'ते तर असंच पसरवणार ना. फालतू गोष्टी. निगेटिव्ह पीआर. हिचं म्हणणं दाबा. एक भीती असते मी माझं तोंड उघडायच्या आधीच माणसावर कसा दबाव आणू शकतो. मी एक एक पॉइंट जर सांगितला ना तर हा शो तुला चिल्लर वाटेल.'

अरबाज जिच्याविषयी बोलतो ती आरजे महावश आहे. तिला आपण चांगलंच ओळखतो असं अरबाजचं म्हणणं आहे. शोमध्ये सुरुवातीपासूनच धनश्री युजवेंद्रसोबतच्या घटस्फोटाबाबतीत बोलत आली आहे. तसंच शोमध्ये पवन सिंह आहे त्याच्यासोबतचे तिचे कॉमेडी रील्सी आजकाल खूप व्हायरल होतात. पवन सिंह धनश्रीवर काही ना काही कमेंट करतो कधी फ्लर्ट करतो जे पाहणं खूपच मनोरंजनात्मक आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारव्हायरल व्हिडिओ