Join us

Apurva-Shilpa Baby: अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानीच्या घरी छोट्या परीचं आगमन, लग्नाच्या १८ वर्षानंतर झाले आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:30 IST

लग्नाच्या १८ वर्षानंतर अपूर्व आणि शिल्पा आई-बाबा झालेत. अपूर्व अग्निहोत्री व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

शाहरुख खान आणि महिमा चौधरी स्टारर 'परदेस' या चित्रपटात राजीवची भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेल्या अपूर्वा अग्निहोत्री बाबा झाला आहे. होय, अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अपूर्व अग्निहोत्री (Apurva Agnihotri)आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी(Shilpa Saklani)  लग्नाच्या 18 वर्षानंतर आई-वडील झाले आहेत.

अपूर्वने व्हिडीओमध्ये आपल्या मुलीचा चेहराही चाहत्यांना दाखवला असून कॅप्शनसह त्याचा आणि शिल्पाचा आनंद व्यक्त केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अपूर्वाने लिहिले- 'आणि अशा प्रकारे हा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस ठरला. कारण, देवाने आपल्याला सर्वात विशेष, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, चमत्कारिक भेट दिली आहे.  शिल्पा आणि मी आमची लाडकी मुलगी ईशानी कानू अग्निहोत्री हिची ओळख करू देऊ इच्छितो.  तिच्यावर तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करा.

व्हिडिओमध्ये शिल्पा आपली मुलगी इशानीला कुशीत घेतले  आहे आणि अपूर्व मुलीकडे प्रेमाने पाहत आहे. व्हाइट आणि पिंक कलरच्या ड्रेसमध्ये इशानी खूपच क्यूट दिसत आहे. अपूर्व अग्निहोत्रीने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनीही अपूर्व आणि शिल्पाचं अभिनंदन केलं आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अपूर्व शेवटचा टीव्ही जगतातील नंबर वन शो 'अनुपमा' मध्ये दिसला होता, परंतु काही वेळाने त्याने शोमधून एक्झिट घेतली.  

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी