Join us

बाप्पाची स्थापना होताच अर्जुनला होणार शिक्षा? 'आप्पी आमची कलेक्टर'मध्ये रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 18:02 IST

Appi amchi collector: गणरायाचं ज्या दिवशी आगमन होणार त्याच दिवशी अर्जुनची कोर्टात सुनावणी होणार आहे.

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक जण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला लागला आहे. यामध्येच छोट्या पडद्यावरही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो. अनेक मालिकांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यात आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत एकीकडे गणरायाची स्थापना होणार आहे. तर, दुसरीकडे अर्जुनला शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत एका नवा ट्विस्ट येणार आहे.

गणरायाचं ज्या दिवशी आगमन होणार त्याच दिवशी अर्जुनची कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्जुनला शिक्षा होणार का? असा प्रश्न सगळ्या कदम कुटुंबियांना पडला आहे. घरात गणरायाची स्थापना केल्यानंतर अर्जुन कोर्टाच्या दिशेने रवाना होतो. त्यामुळे घरातील प्रत्येकाची चिंता वाढते. मात्र, काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे असा विश्वास आप्पी अर्जुनला देते. त्यावर, अर्जुन सुद्धा आप्पीसाठी जेवणाचा डबा पाठवून तिला हरतालिकेचा उपवास सोडायला सांगतो. सोबतच तिला एक चिठ्ठी पाठवतो. या चिठ्ठीत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, आता गणरायाच्या कृपेने अर्जुनची शिक्षा टळणार का? आप्पी आणि त्याचा संसार पुन्हा नव्याने सुरु होणार का? या सगळ्यांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी