Join us

अनुपमाने शेअर केला आतापर्यंतचा सगळ्यात ग्लॅमरस व्हिडीओ, रुपाली गांगुलीच्या लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:39 IST

अलीकडेच रुपाली गांगुलीने तिच्या इन्स्टा हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

टीआरपीच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या 'अनुपमा'(Anupama)  या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप चर्चेत असते, पण अभिनेत्री रुपाली गांगुली(Rupali Ganguly) ची बातच न्यारी आहे. तिने आपल्या ऑनस्क्रीन व्यक्तिरेखेने लोकांची मनं तर जिंकलीच, पण ऑफस्क्रीन ही लोकांचं मनोरंजन करण्याची संधीही ती सोडत नाही.

अलीकडेच रुपाली गांगुलीने तिच्या इन्स्टा हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या अदांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. व्हिडिओमध्ये रुपाली गांगुली 'गुरु' चित्रपटातील 'तेरे बिना' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. लांब जॅकेटसह चमकदार ब्रॅलेट आणि ब्राऊन स्कर्ट घातलेली रूपाली ब्युटीफुल दिसतेय. हा व्हिडिओ समोर आल्यापासून चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

रुपाली गांगुली प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अरुण गांगुली यांची मुलगी आहे. तिने बालकलाकार म्हणून 'साहेब', 'अंगारा', 'दो आँखे बारह हाथ' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात 'संजीवनी' या मालिकेतून केली होती. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेतून. तिने 'बा, बहू और बेबी' आणि 'परवरिश - कुछ खट्टी कुछ मेथी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, 'अनुपमा'मधील अनुपमाच्या भूमिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

रुपाली गांगुली ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. 2013 मध्ये त्यांनी बिझनेसमन अश्विनी के वर्मासोबत लग्न केले आणि त्यांना एक मुलगा रुद्रांश देखील आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार