Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिताला अभिनेत्री नाही तर हवाईसुंदरी बनायचं होतं, या कारणामुळं केलं अभिनयात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 14:34 IST

अंकिता आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिता आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आपल्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकाशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.  पण अंकिताला कधी अभिनेत्री व्हायचेच नव्हतं हे सांगितल्यास तुम्हाला पटणार नाही. अंकिता खरंतर हवाईसुंदरी बनण्याचे आणि आकाशात भरारी मारायचं स्वप्न बघत होती. परंतु तिच्या नशिबात होतं की, ती फिल्म इंडस्ट्रीत काम करेल आणि घडलंही तसंच. 

इंदूरमध्ये १९ डिसेंबर १९८४ रोजी एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्मलेली अंकिताला एअर होस्टेस व्हायचे होते. अंकिताचे शिक्षण हे इंदूरमधून पुर्ण झाले. हवाई सुंदरी होण्यासाठी अंकिताने  फ्रँकफिन अॅकॅडमीत प्रवेश घेतला. पण, तिची निवड झी सिनेस्टारचा शोसाठी झाली आणि तेथूनच तिच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला. मुंबईत आल्यानंतर अंकिताने सुरुवातील मॉडेलिंग केले. यातच तिला  'बली आयु को सलाम' हा शो मिळाला. पण, हा शो कधीच प्रसारित झाला नाही.

पण अंकिता खचली नाही. यातच तिला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मध्ये काम मिळाले. या मालिकेतील अर्चना या भुमिकेतून ती घराघरात पोहचली. 'पवित्र रिश्ता' मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. अंकिता ही कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका'मध्ये  झळकली होती. शिवाय, २०२० मध्ये ती टायगर श्रॉफसोबत 'बागी 3' मध्येही दिसली होती. सध्या अंकिता गी पती विकी जैनसोबत 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झाली आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीटेलिव्हिजन