Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाईव्ह ऑडियन्ससमोर अंकितानं नवऱ्याला केलं रोस्ट, गमती गमतीत सासूलाही दिलं चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 20:15 IST

'बिग बॉस 17' चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ नक्कीच आहे.

'बिग बॉस 17'च्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत. 'बिग बॉस 17'ची चाहत्यांमध्ये क्रेझ देखील आहे. आता 'बिग बॉस 17' चा फिनाले जवळ आलाय. सध्या शोमध्ये फक्त 8 सदस्य उरले आहेत, जे फिनालेमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यातच शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

नुकतेच समोर आलेल्या प्रोमध्ये बिग बॉसच्या घरात लाईव्ह ऑडियन्ससमोर एक टास्क ठेवण्यात आला होता. स्पर्धकांना एकमेंकाना रोस्ट करायचे होते. यामध्ये अंकिताने पती विकी जैनला रोस्ट केलं. ती म्हणाली, 'या घरात विकी आणि माझे खूप भांडण झालं. पण, हे आम्ही हे फक्त येथेच करतो असं नाही. आम्ही घरीही असेच भांडत असतो. जर तुम्हाला आमच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले तर तुम्हाला असेच ५-६ बिग बॉस एपिसोड्स मिळून जातील'. 

पुढे ती म्हणाली, 'मला बोलण्याची संधी मिळाली आहे. तर मी येथे बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण, माझा नवरा फक्त इथेच ऐकू शकतो. बाकी इतर वेळी तो माझं ऐकत नाही. मी माझ्या नवऱ्याला लाथ मारेल, उशी मारले. पण, मी सर्व नाते मनापासून जपते. अंकिता लोखंडे ही फक्त पवित्र नात्यासाठी ओळखली जाते', असे म्हणत अंकिताने सासूलाही अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. यानंतर अंकिताने मुनव्वर फारुकीलाही रोस्ट करत राग व्यक्त केला. हा प्रोमोचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

आधी ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले हा 15 आठवड्यांनंतर 28 जानेवारी 2024 रोजी होणार होता. मात्र आता ‘बिग बॉस 17’चा विजेता एक दिवसानंतर म्हणजेच 29 जानेवारी 2014 रोजी घोषित केला जाणार आहे. ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर कलर्स टीव्हीवर डान्स शो ‘डान्स दिवाने’ सुरू होणार आहे. या शोचा ग्रँड प्रीमिअर 3 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूडबिग बॉससलमान खान