Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीतीमुळे झालं होतं सुशांत-अंकितामध्ये जोरदार भांडण; अभिनेत्याने रडून मागितली होती माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 12:42 IST

Ankita lokhande: bigg boss मध्ये पहिल्या दिवसापासून अंकिता, पती विकी जैन आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत या दोघांमुळे चर्चेत येत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस 17 (bigg boss 17) मध्ये सहभागी झाली आहे. या शो मध्ये पहिल्या दिवसापासून अंकिता, पती विकी जैन आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत या दोघांमुळे चर्चेत येत आहे. एकीकडे विकीसोबत तिचे सतत मतभेद, वाद होत आहेत. तर, दुसरीकडे ती सतत सुशांतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. त्यामुळे तिची लव्हलाइफ आणि मॅरिड लाईफ दोन्ही चर्चेत आहेत. यामध्येच अंकिताने सुशांतचा एक किस्सा शेअर केला. यात ती सुशांतच्या बाबतीत किती पझेसिव्ह होती हे तिने सांगितलं.

सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अंकिता, अभिषेक कुमार, आयशा खान आणि अनुराग डोभाल यांना सुशांतच्या काही आठवणी सांगतांना दिसत आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्यामुळे तिच्यात आणि सुशांतमध्ये वाद झाल्याचंही तिने सांगितलं.

"ज्यावेळी 'शुद्ध देसी रोमान्स' हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी सुशांतने सगळं थिएटर बूक केलं होतं. त्याला माहित होतं त्याचा रोमॅण्टिक सीन पाहिल्यावर मला राग येईल. सिनेमा पाहत असताना मी माझी नखं खुर्चीवर रुतून ठेवली होती. त्यानंतर त्याने माझे हात पाहिले आणि तो घरी पळाला. त्याने तो सिनेमा पूर्ण पाहिलाच नाही. आणि, मी सगळा सिनेमा पाहिल्यावर घरी जाऊन खूप रडले", असं अंकिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मला रडताना पाहून तो सुद्धा रडायला लागला आणि माझी माफी मागू लागला. यापुढे असं होणार नाही असंही त्याने सांगितलं. पण, जेव्हा मी सुशांतसोबत असायचे मला ते ऑनस्क्रीन सीन आठवायचे. मात्र, मी लगेच स्वत:ला सावरलं. तुमच्या बॉयफ्रेंड कोणाला तरी किस करताना पाहिल्यावर विचित्र वाटतं. पण, यामुळे मी कोणाच्या मार्गातला अडथळा नाही होऊ शकतं. 'पीके' सिनेमातही त्याचे आणि अनुष्का शर्माचे असे सीन पाहून मला चक्कर आली होती."

टॅग्स :अंकिता लोखंडेटेलिव्हिजनसुशांत सिंग रजपूतअनुष्का शर्मापरिणीती चोप्राबिग बॉस