Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैभव तत्ववादीसोबतचा माझा 'तो' सीन पाहून विकी खूप चिडला होता, अंकिता लोखंडेचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:29 IST

तो सीन पाहून विकी म्हणाला 'हटाओ इसको'!

'बिग बॉस 17' मधून अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे कपल घराघरात पोहोचलं आहे. अंकिता तर आधीपासूनच टेलिव्हिजन क्वीन आहे मात्र आता विकीबद्दलही चाहत्यांना बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या. बिग बॉस संपल्यानंतर अंकिताची मुलाखत आता व्हायरल होत आहे. यामध्ये तिने पती  विकी जैनबद्दल मोठा खुलासा केला आहे.

अंकिता लोखंडेने काही वर्षांपूर्वी कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' मध्ये छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती. यामध्ये मराठी अभिनेता वैभव तत्ववादी तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत होता. या सिनेमा विकी आणि अंकिताचं एक गाणं होतं. त्या गाण्यात अंकिताला वैभवच्या इतकं जवळ बघून विकी चिडला होता असा खुलासा तिने केला आहे. 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "डंका लगा रे हे माझं गाणं आहे ना त्यात मी मुलाला ज्या पद्धतीने पकडते ते पाहून विकी म्हणतो हटाओ इसको. चॅनल बदला. विकी असं काही बघूच शकत नाही. त्याने चुकीचं काहीही पाहिलं ना तर त्याचं डोकं... त्याला अजिबात आवडत नाही. तो खूप चिडतो."

बिग बॉसमध्ये अंकिता आणि विकीचं नातं चव्हाट्यावर आलं होतं. दोघांमध्ये रोज भांडणं होत होती. नॅशनल टेलिव्हिजनवर त्यांची भांडणं व्हायची. इतकंच नाही तर अंकिताने घटस्फोटाचाही अनेकदा उल्लेख केला. अंकिताच्या सासूमुळे तर हा वाद आणखी चिघळला होता. नंतर अंकिताला चाहत्यांकडून सहानुभूती मिळणं बंद झालं. कारण ती विनाकारण विकीशी वाईट वागत होती. एवढं करुनही अंकिता बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकली नाही. आता ती नुकतीच विकीसोबत बिलासपूरला सासरी गेली आहे. या शोमुळे सासू सासऱ्यांसोबतही तिचे वाद झाले आहेत. मात्र आता सगळं ठीक होईल असं विकी-अंकिता म्हणाले आहेत. 

बिग बॉसनंतर आता अंकिताला सिनेमा मिळाला आहे. रणदीप हुडासोबत 'वीर सावरकर' यांच्या सिनेमात अंकिताची वर्णी लागली आहे. तर विकी जैनच्या प्रसिद्धीतही वाढ झाली आहे. त्यालाही बिग बॉसमुळे चांगलाच फायदा झाला आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेवैभव तत्ववादीबिग बॉसबॉलिवूड