Join us
Daily Top 2Weekly Top 5

Anita Hassanandani Birthday Special : अनिता हंसनंदानीने दारूच्या नशेत केले असे काही की मागावी लागली होती पतीची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 13:23 IST

रोहित आणि अनिता यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर २०१३ मध्ये लग्न केले. रोहित हा एक व्यावसायिक आहे. रोहित आणि अनिता यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे.

ठळक मुद्देएकदा दारूच्या नशेत ती रोहित सोबत विमानातून निघून गेली होती. ही गोष्ट चुकीची असल्याचे अनिताला दुसऱ्या दिवशी जाणवले आणि तिने यासाठी रोहितची माफी मागितली होती आणि तुझी परवानगी नसेल तर यापुढे दारूला स्पर्श देखील करणार नाही असे सांगितले होते.

अनिता हंसनंदानीचा आज म्हणजेच १४ एप्रिलला वाढदिवस असून तिने हिंदी, दाक्षिणात्य आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे. तिने छोट्या पड्यापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कभी सौतन कभी सहेली, काव्यांजली, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कसम से यांसारख्या तिच्या अनेक मालिका गाजल्या. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये खूपच छोट्या भूमिका साकारल्या आहेत. ताल या चित्रपटात ती ऐश्वर्या रायच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने कुछ  तो है, कोई आपसा या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. 

ये है मोहोब्बते या मालिकेत साकारलेल्या तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिची नागीन ३ ही  मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेत ती विशाखा ही भूमिका साकारत आहे. अनिताचे खऱ्या आयुष्यात रोहित रेड्डी सोबत लग्न झाले आहे. रोहित आणि अनिता यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर २०१३ मध्ये लग्न केले. रोहित हा एक व्यावसायिक आहे. रोहित आणि अनिता यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची ओळख जिम मध्ये झाली होती. या आधी त्याने एका पबमध्ये अनिताला पहिले होते. पण त्यावेळी तिच्याशी बोलण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्यानंतर फेसबुक द्वारे त्याने तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली. ती एक अभिनेत्री असल्याचे त्यावेळी त्याला माहीतच नव्हते. काहीच महिन्यात त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 

अनिताने तिच्या आयुष्यातील एक किस्सा एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितला होता. याविषयी आज तकने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, अनिताला दारू पिण्याची सवय आहे. एकदा दारूच्या नशेत ती रोहित सोबत विमानातून निघून गेली होती. ही गोष्ट चुकीची असल्याचे अनिताला दुसऱ्या दिवशी जाणवले आणि तिने यासाठी रोहितची माफी मागितली होती आणि तुझी परवानगी नसेल तर यापुढे दारूला स्पर्श देखील करणार नाही असे सांगितले होते. पण माझ्यासाठी तुला बदलण्याची  गरज नाहीये असे रोहितने त्यावेळी स्पष्ट केले होते. केवळ तू सेलेब्रिटी असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेतली पाहिजे असे त्याने तिला सांगितले होते. 

रोहितच्या आधी अनिता काव्यांजली मालिकेतील तिचा सहकलाकार एजाज खान सोबत नात्यात होती. त्यांचे अफेअर जवळजवळ सहा वर्ष सुरु होते.    

 

टॅग्स :टेलिव्हिजन