Anagha Atul : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा अतुल हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. चाहतेदेखील तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तर अनघा अतुलच्या घरात आनंदाचे वातावरण असून लगीनघाई सुरू झाली आहे. नुकतंच अनघाने शेअर केलेला लग्नघराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अनघा अतुलच्या घरी लगीनघाई सुरू आहे. तिचा भाऊ अखिलेश भगरे हा लग्नबंधनात अडकणार आहे. अखिलेशच्या लग्न विधींना सुरूवात झाली आहे. अनघने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुंदर फुलांनी सजवलेलं लग्नघर पाहायला मिळत आहे. अनघाचा भाऊ अखिलेश हा वैष्णवी जाधव हिच्याशी लग्न करणार आहे. मे महिन्यात अखिलेश आणि वैष्णवीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला होता.
अनघा आणि अखिलेश हे 'झी मराठी' वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची मुलं आहेत. गेल्या वर्षी अनघा आणि अखिलेशने पुण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं. हे हॉटेल शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी आहे. या हॉटेलमध्ये शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण, परिपूर्ण थाळीचा आस्वाद खवय्यांना घेता येतो. 'वदनी कवळ' असं या हॉटेलचं नाव आहे. मराठीतील बरेच कलाकार अनेकदा या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतना दिसत असतात.