Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसणार अमोल कोल्हेंची कन्या, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 16:57 IST

मालिकेतील बाल कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. आता या मालिकेत आणखी एका बालकलाकाराची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे ताराची.

ठळक मुद्देडॉ. अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हेनं ताराची भूमिका साकारली आहेआद्यानं या भूमिकेसाठी विशेष मेहनतही घेतली आहे

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय. मालिकेतील बाल कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. आता या मालिकेत आणखी एका बालकलाकाराची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे ताराची. डॉ. अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हेनं ताराची भूमिका साकारली आहे.

आद्या या मालिकेत स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारत आहे. आद्याची ही पहिलीच मालिका असून तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनतही घेतली आहे. अमोल कोल्हे आणि आद्या ही बाप-लेकीची जोडी प्रथमच छोट्या पडद्यावर काम करत आहेत. त्यामुळं आद्यापेक्षा जास्त तिचे बाबा म्हणजेच डॉ. अमोल कोल्हे अधिक उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आद्याच्या या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका त्याच प्रयत्नांचा एक भाग. चित्रीकरण मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलंय.

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीडॉ अमोल कोल्हे