Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमित सियाल पोलिसांची भूमिका साकारण्यासाठी घेतोय अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:24 IST

काठमांडू कनेक्शन’या मालिकेमध्ये अमित पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारतो आहे.

काठमांडू कनेक्शन’या मालिकेमध्ये एका पोलीस अधिका-याची भूमिका बजावणा-या अमित सियाल या मालिकेतील प्रत्येक प्रसंग अचूक साकारला जावा यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. मालिकेमध्ये कॅसिनोमध्ये घडणा-या एका प्रसंगात अमितची व्यक्तिरेखा पोकरचा डाव खेळताना दाखविण्यात आली आहे. अमितने हा खेळ पूर्वी कधीही खेळलेला नसल्याने आजूबाजूच्या लोकांकडून तो शिकून घ्यायचे त्याने ठरवले.अमितने  भूमिकेची गरज म्हणून शिकून घेतलेला हा खेळ आता या मालिकेतील कलाकारांसाठी फावल्या वेळेतला आवडता विरंगुळा ठरला. 

अमित सियाल सांगतो, “अभिनेता म्हणून आपले कसब अधिक विकसित करण्यासाठी आणि नव्या गोष्टी शिकण्यासाठी मदत करणा-या वेगवेगळ्या भूमिका आम्ही साकारत असतो. या मालिकेतील व्यक्तिरेखेच्या प्रवासात पोकरचा प्रसंग खरेतर खूप लहानसा आहे, पण त्या खेळाने माझे मन वेधून घेतले. मला तो अधिक खोलात जाऊन शिकून घ्यावासा वाटला, परिणामी मी तो प्रसंगही अधिक चांगल्याप्रकारे साकारू शकलो. पोकर खरोखरंच इतक्या चतुराईचा खेळ आहे की काम संपल्यानंतर सहकलाकारांबरोबर हा खेळ खेळल्यावर मन ताजेतवाने होते आणि बुद्धी एकाग्र होते.

टॅग्स :टेलिव्हिजन