Join us

Shocking! सेटवर कोसळली ‘गंदी बात’ची ही अभिनेत्री; ICUमध्ये देतेय मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 13:51 IST

‘गंदी बात’ या वेबसीरिजची लीड अ‍ॅक्ट्रेस गहना वशिष्ठ हिला आज सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय.

‘गंदी बात’ या वेबसीरिजची लीड अ‍ॅक्ट्रेस गहना वशिष्ठ हिला आज सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय. काल पहाटे 4.30 वाजता वेब सीरिजचे शूटींग सुरु असताना गहना अचानक भोवळ येऊन खाली कोसळली. बेशुद्धावस्थेत तिला मुंबईच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आले. तूर्तास गहनावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय.

रूग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गहनाला व्हेंटिलेटर व अन्य सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारगीना सलग 48 तास शूटींग करत होती. काहीही पौष्टिक न खाता केवळ एनर्जी ड्रिंक्स घेऊन  तिचे शूट सुुरू होते.

गहना डायबिटीजची रूग्ण आहे. अनेक ताज उपाशीपोटी राहिल्याने तिचे बीपी कमी झाले आणि ती सेटवर कोसळली. यादरम्यान तिने काही औषधेही घेतली. या औषधांमुळे की अन्य कुठल्या वेगळ्या कारणाने गहनाची प्रकृती बिघडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :टेलिव्हिजनवेबसीरिज