Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्मा शोमुळे अली असगरच्या लेकाची शाळेत व्हायची रॅगिंग, अभिनेत्याने सांगितलं शो सोडण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:03 IST

Ali asgar: अलीने साकारलेल्या दादीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. मात्र, हीच भूमिका त्याच्या मुलांसाठी त्रासदायक ठरली.

80 च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करुन लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अली असगर. आजवरच्या कारकिर्दीत त्याने अनेक भूमिका साकारल्या. परंतु, त्याला खरी ओळख मिळाली ती कपिल शर्मा शोमध्ये दादी ही भूमिका साकारुन. अलीने साकारलेल्या दादीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. मात्र, हीच भूमिका त्याच्या मुलांसाठी त्रासदायक ठरली. त्याच्या या भूमिकेमुळे त्याच्या मुलांना शाळेत बराच त्रास सहन करावा लागला.

अलिकडेच अलीने मनीष पॉलच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने स्त्री पात्राच्या भूमिका साकारण बंद का केलं यामागचं कारण सांगितलं. ''मी एकाच धाटणीची भूमिका सतत करतोय याची मला जाणीव झाली. आणि, मी या भूमिका या पुढे न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या भूमिका जे लोक आवडीने पाहायचे त्यांना माझा हा निर्णय ऐकून नक्कीच धक्का बसला असेल. आणि, त्यांनी मला वेड्यात काढलं असेल. त्यावेळी कॉमेडी सर्कस हा शो शनिवार- रविवार या दोन दिवशी प्रसारित व्हायचा. ज्यात मी स्त्री पात्र साकारत होतो. मात्र, सतत या भूमिका साकारुन माझी प्रतिमाही तशीच तयार झाली होती. त्यामुळे लेखक सुद्धा माझ्यासाठी त्याच त्या प्रकरच्या भूमिका लिहित होते. मला या भूमिकेव्यतिरिक्त अन्यही खूप काही करायचं आहे. मला फक्त एक संधी हवी आहे'', असं अली म्हणाला.

अलीच्या स्त्री पात्रामुळे मुलांना शाळेत व्हावं लागलं ट्रोल

''मी साकारत असलेल्या स्त्री पात्रामुळे माझ्या मुलांना शाळेत खूप त्रास सहन करावा लागला. शाळेतली मुलं त्यांचं रॅगिंग करायचे. त्यांना ट्रोल करायचे. ज्यावेळी सतत माझ्या मुलांना या सगळ्याचा सामना करावा लागला त्यावेळी मी या भूमिका करणं बंद करायचं ठरवलं. कॉमेडी सर्कस सोडल्यानंतर मी जवळपास ९ महिने घरीच बसून होतो. पण, कोणतीही स्त्री पात्राची भूमिका स्वीकारली नाही'', असं अली म्हणाला.

दरम्यान, २०१७ मध्ये अलीने कपिल शर्मा शो सोडला. सध्या अली असगर त्याच्या सिनेमांच्या चित्रीकरणात बिझी आहे. २०२४ मध्ये तो एका मराठी सिनेमात झळकला होता. त्यानंतर तो २०२५ मध्ये पिंटू की पप्पी या सिनेमात दिसला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Ali Asgar's son faced bullying due to 'Kapil Sharma Show'.

Web Summary : Ali Asgar revealed he quit portraying female characters, including 'dadi,' after his children faced bullying at school because of his roles. He remained unemployed for nine months, refusing similar roles. He was last seen in the Marathi film in 2024.
टॅग्स :टेलिव्हिजनअली असगरकपिल शर्मा सेलिब्रिटी