Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बाबा तुला दुसरं काही येत नाही का?", अली असगरला मुलानं संतापून विचारलेला प्रश्न, अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 11:19 IST

आम्ही सगळे एकत्र डिनर करत होतो, माझा मुलगा ताडकन उभा राहिला आणि तुम्हाला आणखी काही करता येत नाही का? असं तो वैतागून लहान मुलगा मला म्हणाला.

'द कपिल शर्मा' या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे अली असगर. 'द कपिल शर्मा' शोमध्ये दादीची भूमिका अलीने मोठ्या खुबीने साकारली होती..25 जुलै 1970 रोजी जन्मलेले अली असगर कोणत्याही परिचयाची गरज नाही.‘द कपिल शर्मा शो’मध्ये दादीचं पात्र साकारून सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता अली असगर याला आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अलीने साकारलेली दादी ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली  होती मात्र  व्यक्तिरेखेमुळे अलीच्या मुलांना प्रचंड त्रास दिला होता.

 ‘ द कपिल शर्मा शो’ सोडल्यानंतर अली असगर ‘झलक दिखला जा 10’मध्ये (Jhalak Dikhhla Jaa 10) दिसला होता. या शोदरम्यान त्याने का किस्सा सांगितला होता. 

 ‘झलक दिखला जा 10’मधून आऊट झाल्यावर अलीने सांगितलं होतं की, ‘कॉमेडी शोमध्ये मी अनेक स्त्री पात्र साकारली. पण यामुळे माझ्या दोन्ही मुलांना खूप काही सोसावं लागलं. माझ्या मुलांना शाळेत सर्व चिडवायचे. माझी मुलं 4 थी, 5वीत असताना त्यांना माझ्यामुळे ट्रोल व्हावं लागलं. मी एकदा बसंती ही व्यक्तिरेखा साकारली होती. तेव्हा माझ्या मुलाला शाळेतल्या त्याच्या मित्रांनी प्रचंड त्रास दिला.  रे याचा बाप बसंती आहे, याला दोन-दोन आई आहेत, असं म्हणून ते त्याला चिडवायचे. एकदा शनिवारचा दिवस होता,आम्ही सगळे एकत्र डिनर करत होतो आणि टी.व्हीवर माझ्या एका शोची अनाउंसमेंट झाली. मी पुन्हा एका स्त्री पात्रात भेटायला येणार आहे, ते ऐकून माझा मुलगा ताडकन उभा राहिला आणि  तुम्हाला आणखी काही करता येत नाही का? असं त्याने मला संतापून विचारलं.  बाबा,तुम्हाला दुसरं काही करता येता नाही का? असं तो वैतागून लहान मुलगा मला म्हणाला.

तुमच्यामुळे मला शाळेत मुलं चिडवतात, हे त्याने त्यादिवशी सांगितलं.  त्यादिवशी मुलाच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केलं. पुन्हा एकदा रविवारच्या दिवशी मी त्याला टीव्हीवर स्त्री पेहरावात दिसलो. तो काहीच न बोलता, न जेवता उठून निघून गेला.  त्याच्या त्या वागण्यानं मला विचार करायला भाग पाडलं आणि मी स्त्री व्यक्तिरेखा न करण्याचा निर्णय घेतला.  जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा विश्वास ठेवा माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी 9 महिने प्रत्येक प्रोजेक्टला फक्त नकार देत सुटलो. कारण मला फक्त स्त्री व्यक्तिरेखा ऑफर केल्या जायच्या, मी एक अभिनेता आहे. मी फीमेल पात्र रंगवतो आणि मी इतरही अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण जेव्हा मी कॉमेडीच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवलं ,तेव्हा मला स्त्री पात्रच ऑफर केली गेली. मला त्यावरनं ट्रोलही केलं गेलं. माझ्याविषयी खूप उलट-सुलट लिहिलं गेलं. नामर्द आहे,बेशरम आहे. काय काय म्हणायचे लोक. मी नेहमी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, असा खुलासा अलीने यादरम्यान केला होता.  

टॅग्स :टिव्ही कलाकार