Join us

Akshaya Deodhar-Hardik Joshi : 'सदा सौभाग्यवती भव:!' अक्षया देवधरच्या फोटोशुटचीच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 15:17 IST

नववधू लाल नऊवारी नेसून मांडवात आली होती. या नऊवारी साडीतले अक्षराचे फोटो बघावे तितके कमीच आहेत.

Akshaya Deodhar-Hardik Joshi : मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला मधील सुपरहिट जोडी राणादा आणि पाठकबाई नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. अगदी पारंपारिक लुक केलेल्या अक्षरा देवधरने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले. त्यांच्या लग्नाच्या फोटोशुटचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. नववधू लाल नऊवारी नेसून मांडवात आली होती. या नऊवारी साडीतले अक्षराचे फोटो बघावे तितके कमीच आहेत. (Akshaya Deodhar Hardik Joshi Wedding)

अक्षराच्या नव्या फोटोंमध्ये तिने लाल नऊवारी साडीवर लाल रंगाचे घुंगट घेतले आहे. यावर 'सदा सौभाग्यवती भव:' असे विणलेले आहे. यातील तिचे फोटो खुपच सुंदर आले असून यावरही चाहत्यांचे कमेंट्स भरभरुन येत आहेत. कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात सोन्याचा होर आणि हे घुंगट असा अक्षयाचा पारंपारिक लुक नजरेसमोरुन जाणार नाही असा आहे.

‘मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक लूक करायचा होता. नऊवारी, खोपा, पारंपारिक दागिने आणि सगळं टिपिकल. कारण मला आवडतं..,’अशी पोस्ट तिने शेअर केली होती. अक्षयाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. आता खरोखरच तुझ्यात जीव रंगला, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अक्षया व हार्दिक ही जोडी एकत्र दिसली आणि या जोडीनं प्रेक्षकांना वेड लावलं. आता ही ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकली आहे आणि चाहतेही खूश आहेत.   

टॅग्स :लग्नअक्षया देवधरहार्दिक जोशीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट