Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाठकबाईंची पहिली मंगळागौर! डाव्या हातावरची मेहंदी पाहून नेटकऱ्यांनी सुनावलं; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:22 IST

अक्षयाने मेहंदीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) सध्या खूपच उत्साहात आहे. लग्नानंतरची ही तिची पहिलीच मंगळागौर आहे. हातावर सुरेख मेहंदी काढतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. अगदी लग्नसोहळ्यात केला तसाच थाट अक्षयाच्या पहिल्या मंगळागौरीचा दिसतोय. अक्षयाही पहिल्या मंगळागौरीसाठी जोरदार तयारी करत आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी राणादा आणि अंजली बाई. दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्न करच चाहत्यांना सुखद धक्काच दिला. २ डिसेंबरला अक्षया आणि हार्दिक यांचा पुण्यात लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचा थाट सोशल मीडियावर सगळ्यांनीच बघितला. आता अक्षयाची पहिली मंगळागौर म्हणल्यावर तीही खासच असणार यात शंका नाही. अक्षयाने मेहंदीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. 'अक्षयाची मंगळागौर' असं तिने हातावर लिहिलं आहे.

अक्षयाने डाव्या हातावर 'ओम त्र्यंबकं यजामहे...' हा मंत्र लिहिला आहे. 'हा मंत्र डाव्या हातावर लिहित नसतात, त्यात काय शक्ती आहे माहित नाही का', डाव्या हातावर कोणताही मंत्र लिहू नका विनंती आहे' असं म्हणत काही नेटकऱ्यांनी तिला सुनावलंही आहे. तर चाहत्यांनी तिच्या लुकची आणि मेहंदीची स्तुती केली आहे. आता अक्षयाच्या मंगळागौरीचे फोटो, व्हिडिओ बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीमराठी अभिनेतासोशल मीडियाट्रोल