Join us

पाठकबाईंची मंगळागौर, अक्षयासह हार्दिकनेही धरला ठेका; व्हिडिओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:59 IST

अक्षयाने लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली. पाठकबाईंच्या मंगळागौरीचाही शाही थाट पाहायला मिळाला.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही जोडी तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत त्यांना प्रेक्षकांनी राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीत पसंत केलं. डिसेंबर २०२२मध्ये अक्षया आणि हार्दिकने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाची सगळीकडे चर्चा रंगली होती. पाठकबाई आणि राणादाने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

अक्षयाने लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली. पाठकबाईंच्या मंगळागौरीचाही शाही थाट पाहायला मिळाला. अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मंगळागौरीचे काही फोटो शेअर केले आहेत. मंगळागौरीसाठी अक्षयाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान करत पारंपरिक लूक केला होता. तर हार्दिकही धोतरमध्ये मराठमोळा रांगडा गडी दिसत होता. अक्षयाच्या मंगळागौरीसाठी पाहुणेमंडळींनीही उपस्थिती दर्शविली होती. तिच्या मंगळागौरीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता अमोल नाईकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन अक्षयाच्या मंगळागौरी कार्यक्रमातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षयबरोबर हार्दिकही मंगळागौरीच्या गाण्यांवर ठेका धरताना व्हिडिओत दिसत आहे. अक्षयाची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, हार्दिक लवकरच वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.  

टॅग्स :अक्षया देवधरमराठी अभिनेताटिव्ही कलाकारहार्दिक जोशी