Join us

‘मुरांबा’ मालिकेतून अक्षयने घेतला ब्रेक अन् गाठली अमेरिका, आता समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:27 IST

Shashank Ketkar : मुरांबा मालिकेत अक्षयची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने ब्रेक घेतला आहे. त्याने मालिकेतून का ब्रेक घेतला यामागचं कारण आता समोर आलं आहे.

गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या वहिन्यांवर अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. जुन्या मालिकांनी निरोप घेतला आहे. त्याजागी नव्या मालिका सुरु झाल्यात. या मालिकांमधून अनेक कलाकरांनी छोट्या पडद्यावर कमबॅक देखील केलं आहे. मालिकांमधले काही कलाकार एकाचवेळी मालिका, नाटक आणि सिनेमा या तिनही माध्यमांमध्ये एकाचवेळी काम करताना दिसतात.  या सगळ्याचा समतोल सांभाळताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. अशा अनेकवेळा कलाकार मालिकेमधून काहीवेळेसाठी ब्रेक घेतात. 

अलीकडेच ठिपक्यांची रांगोळीत मुख्य भूमिका साकारणारी अप्पू उर्फ ज्ञानदा रामर्थीकर मालिकेतून तिच्या एका प्रोजेक्टसाठी ब्रेक घेणार असल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता आणखी एका कलाकाराने मालिकेतून काम करताना ब्रेक घेतल्याचं समोर आलायं.

दरम्यान स्टार प्रवाह काही महिन्यांपूर्वी ‘मुरांबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या मालिकेमध्ये शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) आणि निशानी बोरूले (Nishani Borule) मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेत शशांक केतकर अक्षयची भूमिका साकारतोय शिवानी मुंढेकर रमा तर निशानी रेवाची भूमिका साकारतेय. शशांकने मालिकेतून ब्रेक घेतल्याचं कळतंय. तो सध्या अमेरिकेत आहे. 

सोशल मीडियावर त्याने अमेरिकेतील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. आमने सामने या नाटकाच्या प्रयोगसाठी शशांक अमेरिकेत गेला आहे. या नाटकात त्याच्यासोबत माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलने काम केलं.  

टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकाररसिका सुनिलस्टार प्रवाह