Join us

अक्षय कुमार आणि क्रिती सनॉनच्या बच्चन पांडे’चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 18:38 IST

अक्षय कुमार, क्रिती सनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिमन्यू सिंग यांच्या बच्चन पांडेचा टीव्ही प्रीमिअर होणार आहे.

अक्षय कुमार क्रिती सनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिमन्यू सिंग यांच्या बच्चन पांडेचा  टीव्ही प्रीमिअर होणार आहे. 1ऑक्टोबर रोजी रात्री 8.00 वाजता ‘अ‍ॅण्ड पिक्चर्स’वर  प्रीमिअर  होणार आहे. ‘बच्चन पांडे’चा प्रीमिअर. अ‍ॅक्शन, रोमान्स आणि नाट्यपूर्ण प्रसंगांच्या या धाडसी प्रवासावर आपल्याला घेऊन जात आहे अ‍ॅक्शन चित्रपटांचा राजा अक्षयकुमार. ;बघवा येथील बच्चन पांडेच्या दृष्य अवतारामुळे सर्वजण त्याला वचकून असत. त्यामुळे मीरा या निर्मातीला त्याच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्याची प्रेरणा मिळते. ती आपल्यासोबत एका होतकरू अभिनेत्यालाही नेते. पण या उपक्रमात आपल्याला बच्चन पांडेच्या व्यक्तिरेखेच्या एका वेगळ्याच, बाजूचे दर्शन घडेल, याची तिला कल्पनाही येत नाही. चित्रपटाची कथा सतत अनपेक्षित कलाटण्या आणि जिवावरील धाडसी स्टंट प्रसंगांतून पुढे सरकते. त्यामुळे चित्रपटाची उत्कंठा कायम राहते. पण आपल्या चित्रपटात ती बच्चन पांडेचा खरा चेहरा चित्रीत करू शकते का?

येत्या ऑक्टोबर महिन्यात ‘अ‍ॅण्ड पिक्चर्स’वरील प्रीमिअर पार्टी मालिकेत अनेक धामकेदार चित्रपटांचे प्रीमिअर प्रसारित केले जाणार आहेत. 

टॅग्स :अक्षय कुमार