Join us

"तो उशिरा आला पण...", बिग बॉसच्या सेटवरुन शूट न करताच का गेला अक्षय कुमार; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:25 IST

सलमान खान उशिरा आल्याने अक्षय निघून गेला अशी चर्चा झाली. या चर्चांवर अक्षयनेच मौन सोडलं आहे.

बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले रविवारी रात्री पार पडला. करणवीर मेहराने यंदाची बिग बॉसची ट्रॉफी उचलली. दरम्यान ग्रँड फिनालेला काही सेलिब्रिटींनीही सिनेमाच्या प्रमोशनसाठी मंचावर हजेरी लावली होती. त्यात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि वीर पहाडिया (Veer Pahariya)  हे 'स्काय फोर्स'चं प्रमोशन करण्यासाठी आले होते. मात्र प्रत्यक्ष शूट आधी अक्षय कुमार निघून गेला. सलमान खान उशिरा आल्याने अक्षय निघून गेला अशी चर्चा झाली. या चर्चांवर अक्षयनेच मौन सोडलं आहे.

नुकतंच एका इव्हेंटमध्ये अक्षय कुमार खुलासा करत म्हणाला, "नाही, सलमान उशिरा आला नव्हता. मी बिग बॉसच्या सेटवर गेलो होतो. सलमान नंतर येणार होता कारण त्याचं वैयक्तिक काम होतं. त्याने मला कल्पना दिली होती की तो ३५ ते ४० मिनिटांनी येणार आहे. वीर तिथेच होता त्यामुळे वीरसोबतच त्याने शूट केलं. मला काम होतं म्हणून मी शूट न करताच निघालो."

अक्षय कुमार वेळ पाळण्यात किती काटकोर आहे हे सर्वांनाच माहित आहे. तो सव्वा दोन वाजताच बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता. पण तोवर सलमान आला नव्हता. त्याने १ तास वाट पाहिली. मात्र नंतर त्याला जॉल एलएलबी ३ च्या ट्रायल स्क्रीनिंगसाठी जायचं होतं. म्हणूनच तो तिथून निघाला.

'स्काय फोर्स' सिनेमा २४ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, वीर पहाडिया, सारा अली खान, निम्रत कौर यांची भूमिका आहे. वीर पहाडियाचा हा डेब्यू सिनेमा आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा तो नातू आहे. तसंच जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा तो भाऊ आहे.

टॅग्स :अक्षय कुमारसलमान खानबिग बॉस