Join us

त्या चर्चा खऱ्या ठरल्या! पतीला सोडून ऐश्वर्यानं एकटीनेच साजरी केली दिवाळी, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:55 IST

दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

अभिनेता ऐश्वर्या शर्मा आणि अभिनेत्री नील भट्ट गेले काही महिने चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. ऐश्वर्या आणि नील यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जातंय. आता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. त्याचं कारण ठरतंय ऐश्वर्याचे दिवाळी फोटो. या दिवाळी फोटोंमध्ये ऐश्वर्या ही एकटीच दिसतेय.  

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मध्य प्रदेशमधल्या उज्जैन इथं लग्न केलं. या दोघांची पहिली भेट 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवरच झाली होती. तिथेच ते प्रेमात पडले आणि त्यांनी डेटिंग सुरू केले. दोघांनी 'स्मार्ट जोडी' आणि 'बिग बॉस १७' मध्येही एकत्र भाग घेतला होता. लग्न झाल्यापासून दोघे कायम सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत होते.  पण, आता त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाहीत. आता ऐन दिवाळीतही ते दोघे एकत्र दिसलेले नाहीत. 

ऐश्वर्यानं दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत.  ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत होती. तिने पारंपारिक लूक केला होता.  पण, एकाही फोटोत नील दिसला नाही. त्यामुळे ते दोघे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.  तिच्या या पोस्टवरही चाहत्यांनी तिला "नील कुठे आहे", असे प्रश्न विचारलेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Aishwarya celebrates Diwali solo, fueling separation rumors with husband.

Web Summary : Aishwarya Sharma's Diwali photos without husband Neel Bhatt spark separation rumors. They married in 2021 and participated in shows together but haven't shared photos lately, prompting fans to question Neel's absence.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनदिवाळी २०२५