Join us

ऐश्वर्या व अविनाश नारकरांची होणारी सून पाहिलीत का? फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:38 IST

आहे. ऐश्वर्या यांचा लेक दिसायला खूप हॅण्डसम आहे. तर त्याची गर्लफ्रेंडदेखील तेवढीच सुंदर आहे.

ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) व त्यांचे पती अविनाश नारकर (Avinash Narkar) हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. अभिनयासोबतच त्यांनी खऱ्या आयुष्यातही त्यांच नातं तितकचं मनापासून जपल्याचं पाहायला मिळतं. या जोडप्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. ऐश्वर्या आणि अविनाश यांना अमेय नावाचा मुलगा आहे. ऐश्वर्या यांचा लेक दिसायला खूप हॅण्डसम आहे. तर त्याची गर्लफ्रेंडदेखील तेवढीच सुंदर आहे. विशेष म्हणजे ती कलाक्षेत्रात सक्रिय आहे. ऐश्वर्या यांची होणारी सून नेमकी कोण आहे, हे आपण जाणून घेऊया. 

ऐश्वर्या यांचा एकुलता एक लेक अमेय हा मराठी अभिनेत्री ईशा संजय (Isha Sanjay) हिला डेट करतोय. दोघांच्या नात्यावर खुद्द ईशा हिनेच शिक्कामोर्तब केलं आहे. नुकतंच ईशानं इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधत त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याना तिला "तुझं लग्न झालंय का दीदी?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर तिनं थेट अमेयसोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली. "लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या" असं लिहून तिनं ही पोस्ट थेट अमेयला (Amey Narkar Isha Sanjay) टॅग केली. यावरुन दोघे सध्या 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीप' असल्याचं स्पष्ट झालंय. 

अमेय हा सध्या परदेशात आहे. तो उच्चशिक्षण घेत आहे. तर ईशा ही भारतातच असून 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत काम करतेय.  सूर्यादादाच्या चार बहि‍णींपैकी 'राजश्री' भुमिका ही ईशा साकारतेय. तिला मालिकेत प्रेमाने सगळे राजू म्हणत असतात. तर गर्लफ्रेंड ईशा आणि आपल्या आई-वडिलांप्रमाणेच अमेयलाही कलाक्षेत्रातच करिअर करायचं आहे. गेल्यावर्षी त्यानं दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. 'खरा इन्स्पेक्टर मागावर' या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयनं सांभाळली होती. तो शिक्षण पुर्ण झाल्यानंतर इंडस्ट्रीत पुर्णपणे सक्रीय होणार आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरझी मराठीसेलिब्रिटीमराठी अभिनेता