Join us

ऐश्वर्या अँड अविनाश इज बॅक! जुन्या गाण्यावर शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:18 IST

Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी कायम भन्नाट रिल्स शेअर करत असतात.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. आपल्या उत्तम अभिनयशैलीमुळे चर्चेत येणारी ही जोडी सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे चाहत्यांशी उत्तमरित्या जोडले जातात. हे दोघंही इन्स्टाग्रामवर सतत काही ना काही पोस्ट करत असतात. यावेळी या जोडीने एक छानसं रील शेअर केलं आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्याने अविनाश यांच्यासह 'हाल कैसा है जनाब का?' या गाण्यावर रील केलं आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचेही एक्स्प्रेशन्स कमालचे असून अनेक जण त्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय आहेत. त्यामुळे वेळोवेळी त्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. इतकंच नाही तर ट्रोल करणाऱ्यांनाही त्या चांगले खडे बोल सुनावत असतात. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरटेलिव्हिजन