सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु आहे. अभिनेता विशाल निकम त्याची गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आता आणखी एक मराठी अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर प्री एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो शेअर करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. या अभिनेत्याचं नाव आहे शुभम मुरुडकर.
शुभमने दिली आनंदाची बातमी
शुभमने त्याची गर्लफ्रेंड सृष्टी जाधवसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. 'एक नवी सुरुवात करण्यासाठी आमची कहाणी सुरु झाली आहे. लवकरच आम्ही साखरपुडा करणार आहोत. एकमेकांच्या प्रेमात आहोत.'; अशा शब्दात शुभमने कॅप्शन देऊन चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. शुभम - सृष्टी यांचे रिल आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. या दोघांनी प्री एंगेजमेंट फोटोशूट केलंय, त्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शुभम मुरुडकर गेल्या काही वर्षांपासून मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करत आहे. 'मी संसार माझा रेखिते', 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकांमध्ये शुभमने साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. शुभम सृष्टीसोबत अत्यंत संवेदनशील विषयांवर रिल करत असतो. या दोघांचे रिल चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. आता हे दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांशी लग्नगाठ बांधत असताना सर्वांना आनंद झाला आहे.
Web Summary : Marathi actor Shubham Murudkar announced his engagement to girlfriend Srishti Jadhav with pre-engagement photos. Known for roles in 'Jai Jai Swami Samarth,' Shubham's reels with Srishti are popular. Fans are delighted by the news.
Web Summary : मराठी अभिनेता शुभम मुरुडकर ने गर्लफ्रेंड सृष्टि जाधव से सगाई की घोषणा की। 'जय जय स्वामी समर्थ' में भूमिकाओं के लिए जाने जाने वाले शुभम और सृष्टि के रील लोकप्रिय हैं। प्रशंसक इस खबर से खुश हैं।