Join us
Daily Top 2Weekly Top 5

तन्वी कोलतेच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी! साकारणार सिंचनाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:34 IST

'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीने घेतली एन्ट्री! दिसणार सिंचनाच्या भूमिकेत 

Laxmi Niwas Serial: छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मी निवास' ही लोकप्रिय असणारी मालिका आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर तसेच दिव्या पुगावकर, कुणाल शुक्ला या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. अशातच 'लक्ष्मी निवास' मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीच्या भूमिकेचाही उलगडा झाला. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या...

दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेत  लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची धाकटी सून म्हणजेच सिंचनाचं पात्र अभिनेत्री तन्वी कोलते साकारत होती. मात्र, आता या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीची मालिकेत वर्णी लागली आहे. सध्या अभिनेत्री तन्वी कोलते बिग मराठीच्या सहाव्या पर्वात पाहायला मिळते आहे. त्यामुळे तन्वीला हा शो सोडावा लागला. आता सिंचनाच्या भूमिकेत आता प्रेक्षकांना नवा चेहरा पाहायला मिळतो आहे. 

लक्ष्मी निवास मालिकेत तन्वी कोलतेच्या जागी प्रसिद्ध सोशल मीडिया रिल स्टार धनश्री पाटीलची वर्णी लागली आहे. आता सिंचनाच्या भूमिकेत धनश्री पाहायला मिळतेय. स्वत धनश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. "सिंचना आलीये तुमच्या भेटीला... #लक्ष्मीनिवास" या प्रवासालाही मला तुमची साथ हवीच आहे. म्हणून प्रेम करत राहा आणि मालिका बघत राहा...", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. आता मालिकेत सिंचनाच्या एण्ट्रीने प्रेक्षकांना काय नवीन ट्विस्ट बघायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dhanashree Patil replaces Tanvi Kolte in 'Lakshmi Niwas' as Sinchana.

Web Summary : Dhanashree Patil replaces Tanvi Kolte as Sinchana in 'Lakshmi Niwas' after Kolte joined Bigg Boss Marathi 6. Patil announced her entry via social media, seeking audience support for her portrayal.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया