Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुणीतरी येणार येणार गं ! सई लोकूरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 11:19 IST

सई लोकुरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री होणार आहे.

सई लोकुरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री होणार आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'भागो मोहन प्यारे'मधील  'मधुवंती' आई होणार आहे. नुकतेच अभिनेत्री सरिता मेहेंदळेने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. 

आई होण्याचा आनंद सरिताच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. या फोटोंमध्ये ती तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. सरिताचे डोहाळे जेवण पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले. सरिताच्या डोहाळे जेवणाला  कलाविश्वातीलही काही मंडळी उपस्थित होती. आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सरिता आणि तिचा पती सौरभ दोघेही उत्सुक आहे. 

 

अभिनेत्रीने फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आमच्या कुटुंबात नवा सदस्य येणार असल्याचं म्हटलं आहे. सारिताच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भागो मोहन प्यारे' मालिकेत तिने साकारलेली 'मधुवंती'ची भूमिका मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सरिताने अभिनय क्षेत्रात अनेक वर्ष स्ट्रगल केलं आहे आणि त्यानंतर तिला मधुवंतीची भूमिका मिळाली. मुळची सांगलीच्या असलेल्या सरिताने असे हे कन्यादान, स्वरस्वती मालिकेत देखील अभिनय केला आहे. तसेच ये चल असे नसते आणि अर्धसत्य अशा नाटकांमध्ये तिने आपल्या अभिनयची चुणूक दाखवली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसी