बिग बॉस 13मधील पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा यांच्यातील बॉण्डिंग खूप चर्चेत आले होते. दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. सर्वांना वाटत होते की ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र दोघांनी नेहमीच एकमेकांना चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. नुकतेच पारसने माहिरासोबत लग्न करण्याबाबत विचारले होते त्यावर त्याने काय उत्तर दिले.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}खरेतर पिंकव्हिलासोबत केलेल्या लाइव्ह चॅटदरम्यान एका चाहत्याने पारसला माहिरासोबत लग्न करण्याबाबत विचारले. त्यावर पारस म्हणाला की, हे सगळं झालं आहे. जर माहिरा आणि मला उचक्क्या येतात. आम्ही दोघे लॉकडाउननंतर लग्न करू शकतो जर आम्ही एकमेकांसोबत बांधलेले असू तर नक्कीच होईल.
नुकतीच माहिरा पारस व त्याच्या आईला भेटली. तिघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी बरेच तर्कवितर्क लावले की पारस व माहिरामधील बॉण्डिंग आणखीन वाढत चालली आहे.
नुकतेच माहिराने एका मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाबद्दल असे काही बोलली जे ऐकून सगळे थक्क झाले. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, जेव्हा माहिराला विचारले की, तिला आसिम रियाज, पारस छाब्रा व सिद्धार्थ शुक्ला यांच्यापैकी कोणाशी लग्न करशील, कोणाला मारशील व कोणाशी हुकअप करशील.त्यावर माहिरा म्हणाली की, ती आसिमला मारेल, पारससोबत लग्न करेल व सिद्धार्थसोबत हुकअप करेन.