Aboli Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग आता दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. बिग बजेट मालिका आणि त्यामध्ये येणारे नवनवीन ट्विस्ट या सगळ्या गोष्टी त्यांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' (Aboli) ही मालिकेची सध्या चर्चा होत आहे. अभिनेता सचित पाटील, गौरी कुलकर्णी, प्रतीक्षा वेलणकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. गेल्या ३ वर्षांपासून ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांच्या मनोरंजन करते आहे. दरम्यान, नुकतेच अबोली मालिकेचे १००० एपिसोड्चा टप्पा पार केला आहे. याच निमित्ताने मालिकेतील कलाकरांनी प्रेक्षकांसोबत खास संवाद साधला आहे. शिवाय मालिकेतील नवी एन्ट्री झाल्याची घोषणा देखील केली आहे.
सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेती कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त नव्या घोषणा देखील केल्या आहेत. त्यादरम्यान व्हिडीओमध्ये अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणते, नमस्कार मी गौरी कुलकर्णी म्हणजेच तुमच्या सर्वांच्या आवडत्या मालिकेतील अबोली. आज आम्ही लाईव्ह तुमच्या भेटीला आलो याच कारण म्हणजे आज अबोली मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने आम्ही तुमच्यााासोबत गप्पा मारायला आलो आहेत. सुरुवातील सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार
पुढे गौरी म्हणते, "आज या लाईव्हच्या निमित्ताने दोन नव्या व्यक्ती आपल्या भेटीला आल्या आहेत. अबोली मालिकेत दोन नवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. त्यातील पहिली म्हणजे दीपशिखा भोसले पाटील म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि दुसरी मुयरी वाघ. त्यांचं मालिकेत मनापासून स्वागत आहे. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे यापुढे अबोली मध्ये प्रतीक्षा मॅम यांची भूमिका अभिनेत्री रसिका धामणकर मॅम साकारणार आहेत." अशी माहिती गौरी कुलकर्णीने व्हिडीओद्वारे दिली आहे.
'अबोली' मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी अबोलीच्या सासूबाई म्हणजे रमाची भूमिका उत्तमरित्या साकारली. परंतु आता त्यांनी मालिकेतून एक्झिट घेतली आहे आणि त्यांच्या जागी 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्री रसिका धामणकर दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.