Join us
Daily Top 2Weekly Top 5

ह्रता दुर्गुळेनंतर आता ही मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नीनगाठ, बॅचलर पार्टीचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:00 IST

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अमृता पवार. अमृताच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

गेल्या 4 एप्रिल रोजी अमृता व नीलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिच्या साखरपुड्याचा रोमँटिक व्हिडिओ समोर आला आहे. इंजिनिअर असलेल्या नील पाटील याला अमृताने लाईफ पार्टनर म्हणून निवडला आहे. अमृताच्या लग्नाची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. 

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’या मालिकेव्यतिरिक्त अमृताने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात दुहेरी या मराठी मालिकेतून केली. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेटिव्ही कलाकार