Join us

Bigg Boss संपल्यानंतर अभिनेत्रीला आले आत्महत्येचे विचार, म्हणाली, "मिळालेल्या पैशांमधून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 15:57 IST

घरातून बाहेर आल्यानंतर एका महिन्यातच तिच्या वडिलांचा अपघात झाला.

टेलिव्हिजनवरील Bigg Boss या रिएलिटी शोमुळे अनेक कलाकारांचं नशीबच पालटलं आहे. कोणाला सिनेमांच्या ऑफर्स आल्या आहेत तर कोणाला अन्य रिएलिटी शो मिळाले आहेत. काही कलाकर असेही आहेत ज्यांना बिग बॉस संपल्यानंतर कामच मिळालेलं नाही. मात्र बिग बॉसमुळे सगळेच प्रसिद्धीझोतात येतात यात शंका नाही. नुकतंच बिग बॉस 14 मधील एका महिला स्पर्धकाने आश्चर्यकारक विधान केलं आहे. बिग बॉस संपल्यानंतर तिला आत्महत्येचे विचार आल्याचं ती म्हणाली.

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर या महिला स्पर्धकाला कशाप्रकारचा स्ट्रगल करावा लागला हे समोर आले आहे. ती स्पर्धक आहे बिग बॉस 14 फेम पवित्रा पुनिया (Pavitra Puniya). पवित्राने छोट्या पडद्यावर बरंच काम केलं आहे. मात्र तिच्या या प्रवासात अनेक चढ उतार आले आहेत. नुकतंच ईटाईम्सच्या मुलाखतीत ती म्हणाली, " बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरचा काळ माझ्यासाठी लॉकडाऊनपेक्षाही जास्त वाईट होता. घरातून बाहेर आल्यानंतर एका महिन्यातच तिच्या वडिलांचा अपघात झाला. अशा परिस्थितीत बिग बॉसमधून जी कमाई झाली ती मी कुटुंबाच्या पालनपोषणासाठी खर्च केली. आमच्याकडे पैसे नव्हते असं नाही पण जेव्हा मुलं मोठी होतात आणि कमवायला लागतात तेव्हा आईवडिलांकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे मागत नाहीत. उदाहरणार्थ जर मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला औषधं मागवायची आहेत, तर मी आईकडून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घेणार नाही."

ती पुढे म्हणाली, "बिग बॉसनंतर जवळपास दीड वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होते. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला आत्महत्येचे विचार यायचे. माझ्याजवळ माझं कुटुंब होतं ज्यामुळे मी यातून बाहेर पडू शकले. नाहीतर माहित नाही काय झालं असतं."

पवित्रा पुनियाने 'लव्ह यू जिंदगी','ये है मोहोब्बते','बालवीर रिटर्न्स' या मालिकांमध्ये दिसली आहे. शिवाय ती एमटीव्हीवरील 'स्प्लिट्सव्हिला'मध्येही सहभागी झाली होती. अभिनेता एजाज खानसोबतच्या अफेअर आणि नंतर ब्रेकअपमुळेही ती चर्चेत होती. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार