Join us

'चला हवा येऊ द्या'नंतर अभिजीत खांडकेकर पत्नीसह दिसणार 'या' शोमध्ये, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:27 IST

'चला हवा येऊ द्या'नंतर आता आणखी एका शोमध्ये अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकरही सहभागी होणार आहे.

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वातून अभिजीत खांडकेकर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वाचं तो सूत्रसंचालन करत आहे. 'चला हवा येऊ द्या'नंतर आता आणखी एका शोमध्ये अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकरही सहभागी होणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. 

'चला हवा येऊ द्या'नंतर 'आम्ही सारे खवय्ये' हा झी मराठीचा लोकप्रिय शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे नव्या रुपात हा शो सुरू होणार आहे. संकर्षण कऱ्हाडे या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. 'आम्ही सारे खवय्ये'मध्ये यंदा सेलिब्रिटी जोड्या सहभागी होणार आहेत. यामध्ये अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदाही सहभागी होऊन त्यांचं पाककौशल्य दाखवणार आहेत.

'आम्ही सारे खवय्ये'च्या नव्या प्रोमोमध्ये पाककौशल्य दाखवताना सेलिब्रिटी कपलची तारांबळ उडाल्याचं दिसत आहे. क्षिती जोग-हेमंत ढोमे, अभिजीत खांडकेकर-सुखदा, मृण्मयी देशपांडे तिच्या पतीसह सहभागी झाल्याचं प्रोमोत दिसत आहे. ९ ऑगस्टपासून शनिवार-रविवार दुपारी १ वाजता 'आम्ही सारे खवय्ये' प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :आम्ही सारे खवय्येअभिजीत खांडकेकरटिव्ही कलाकार