Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसनंतर अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी पुन्हा एकत्र, 'या' शोमध्ये दोघांची खास एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 10:02 IST

अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी बिग बॉसनंतर एका नव्या शोमध्ये पुन्हा एकत्र आले आहेत

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन काहीच दिवसांपूर्वी संपला. या सीझनमध्ये सर्वच स्पर्धकांची खूप चर्चा झाली. सूरज चव्हाण जरी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता झाला असला तरीही इतर स्पर्धकांनीही हा सीझन चांगलाच गाजवला. बिग बॉस मराठीमधील अशीच एक चर्चेतील जोडी म्हणजे अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी. अभिजीत आणि निक्की हे दोघे पुन्हा एकदा एका रिएॅलिटी शोमध्ये एकत्र झळकणार आहेत. 

अभिजीत-निक्की या शोमध्ये एकत्र

अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांची मैत्री बिग बॉस मराठीच्या घरात चर्चेत राहिली. आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सोनी टीव्हीच्या 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या मंचावर अभिजीत-निक्की सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी ग्लॅमरस अंदाजात खास एन्ट्री घेऊन सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी निक्की-अभिजीतने 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या स्पर्धकांना खास प्रश्न विचारले. याशिवाय त्यांचं एकमेकांबद्दलचंं मत जाणून घेतलं. 

अभिजीत-निक्कीने बिग बॉसचं घर गाजवलं

अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खऱ्या अर्थाने गाजवला. दोघांची खास मैत्री सर्वांना बघायला मिळाली. इतकंच नव्हे तर दोघांच्या मैत्रीत टोकाचे वादही बघायला मिळाले. तरीही शेवटपर्यंत या दोघांनी घरात एकमेकांना चांगलाच सपोर्ट केलेला दिसला. अभिजीत-निक्की आता 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या मंचावर सहभागी झाल्याने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झालेला पाहायला मिळतोय. 

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठी