Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदनान सामीची मुलगी हीच त्याची सर्वात मोठी चाहती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 07:15 IST

रोयाने सांगितले की त्यांची मुलगी हीच अदनानची सर्वात मोठी चाहती आहे. यावेळी अदनानने या दोघींसाठी आपले ‘तेरा चेहरा’ हे गाणे गाऊन त्यांचे मनोरंजन केले.

'लिफ्ट करा दे'' म्हणत अदनान सामीनं सा-यांच्या काळजात अढळ स्थान प्राप्त केलं.अदनान सामीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण तरल, परंतु दमदार आवाजामुळे लक्षावधी रसिकांच्या मनावर राज्य केले असून त्याच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पण या लक्षावधी चाहत्यांच्या गर्दीत त्याची लहान मुलगी हीच त्याची सर्वात मोठी चाहती आहे.अदनानची पत्नी रोया आणि त्यांची छोटीशी गोड मुलगी मेदिना यांनी अलीकडेच या कार्यक्रमाच्या सेटवर त्याची भेट घेऊन त्याला सरप्राईज दिले होते.

रोयाने सांगितले की त्यांची मुलगी हीच अदनानची सर्वात मोठी चाहती आहे. यावेळी अदनानने या दोघींसाठी आपले ‘तेरा चेहरा’ हे गाणे गाऊन त्यांचे मनोरंजन केले. कारण त्याच्या मुलीच्या जन्मानंतर अदनानने गायलेलं हे पहिलं गाणं होतं. यावेळी मेदिना आपल्या पित्याच्या गाण्यात तल्लीन होऊन गेल्याचं दिसत होतं आणि ती खुशीत दिसत होती. अददनान आणि त्याच्या कुटुंबियांमधील हे प्रेमाचं नातं पाहून सर्वजण भारावून गेले होते.

अदनान आणि मेदिना या बाप-लेकींमधील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील हा हळुवार क्षण ‘स्टार प्लस’वरील या कार्यक्रमाच्या चाहत्यांच्या मनात नक्कीच घर करून राहील. हर्षदीप कौर, अरमान मलिक आणि कनिका कपूर  हे या शोला जज करत आहेत.  

 

टॅग्स :अदनान सामीद व्हॉइस शो