Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले..."; जान्हवी-निक्कीवर विशाखा सुभेदार यांचा तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 09:30 IST

जान्हवीने पॅडीच्या अभिनयावर टीका केली. त्यावर विशाखा सुभेदार यांनी बाजूची घेत निक्की-जान्हवीवर संताप व्यक्त केलाय (bigg boss marathi 5)

काल पॅडी कांबळेच्या अभिनयावर जान्हवी किल्लेकरने घरात टीका केली. 'आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअ‍ॅक्टिंग घरात दाखवत आहेत.' अशा शब्दात पॅडी कांबळेवर जान्हवीने टीका केली. जान्हवीच्या या वक्तव्याविरुद्ध कलाकारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पॅडी कांबळेची मैत्रीण आणि मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी याविषयी संताप व्यक्त केलाय. 

विशाखा सुभेदार यांंनी पॅडीचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना.. पॅडी more power to u. विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक. निकी बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना "जोकर "म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही.गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवी साठी एकदम परफेक्ट आहे. आणि अगं a मुली..तुझा जन्म कदाचित 2000 तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली 1998 मध्ये."

विशाखा सुभेदार पुढे लिहितात, " त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला..येड्यांची जत्रा मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. जानवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते.. गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टाइमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीये तुला. आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय अत्तपर्यंत.. Game आहे game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आहात..ताईंनी glamour मिळवून दिल मराठी सिनेमाला... त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई... त्यांच्या दमावर त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखण बंद करा.जरा बोलताना भान ठेवा.."

विशाखा सुभेदार शेवटी लिहितात, "विनोदामुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, पन्नाशी पूर्ण झालीय त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो..शांत आहे ह्याचा अर्थ अस नाहीये कीं त्याल सेल्फ respect नाहीये..! आता थोडं पॅडी बद्दल.. पॅडी माऊली तूझा खेळ तू खुप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा...! आता तर तू जोरात आलायस..!इतका हिडीस बोलल्यानंतर ही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयत त्याबद्दल तुला सलाम... खचून जाऊ नकोस...! टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज. एक उत्तम reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक...!बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली. काय timing भन्नाट. निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत..  खरंतर जां रोज जां.. आणि तीचे वाळत घातले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडा चा...! करियर वर बोलायच नाही...."

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठी