Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझेच मी गीत गात आहे; उर्मिला कोठारेची मालिकेतून एक्झिट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:54 IST

Tujhech me geet gaat ahe: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये वैदेहीचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवर तुझेच 'मी गीत गात आहे' ही नवीम मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला कोठारे (urmila kothare) हिने तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. स्वरा आणि वैदेही या मायलेकींची कथा सांगणारी ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय झाली. त्यामुळे या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी उर्मिला या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत उर्मिला, वैदेही ही भूमिका साकारत आहे. मात्र, आता या मालिकेत वैदेही या पात्राचं निधन होणार आहे. त्यामुळे सहाजिकच तिची भूमिका साकारणाऱ्या उर्मिला हिलादेखील ही मालिका सोडावी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत वैदेहीला कॅन्सर झाल्याचं निदान नुकतंच झालं आहे. त्यामुळे आपल्या आईला वाचवण्यासाठी स्वरा ठिकठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करुन तिच्या उपचारासाठी पैसे जमा करत आहे. परंतु, योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे वैदेहीचा मृत्यू होतो.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये वैदेहीचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या मालिकेत वैदेहीची भूमिका साकारणारी उर्मिला एक्झिट घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, याविषयी अद्यापही कोणती ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे उर्मिला खरंच या मालिकेतून बाहेर पडणार की नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेटेलिव्हिजनसेलिब्रिटी