Tu Hi Re Maza Mitwa: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या मालिका अगदी आवडीने घराघरात पाहिल्या जातात. दरम्यान,या मालिकांमध्ये अनेकदा कथानकानुसार नवनवीन बदल होताना दिसतात. कधी जुन्या कलाकारांची मालिकेतून एक्झिट होते तर त्याजागी नवीन कलाकारांची एन्ट्री होते.अशातच अलिकडेच स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेतून ईश्वरीची आत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री संजीवनी साठे यांनी मालिका सोडली . त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं कळतंय.
'तू ही रे माझा मितवा' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील ईश्वरी-अर्णवच्या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. अभिनेता अभिजीत आमकर, शर्वरी जोग यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. याशिवाय रुपल नंद, सुरभी भावे, मधुरा जोशी आशुतोष देशमुख आणि स्वाती चिटणीस या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत. त्यात मालिकेत अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी अर्णवच्या आजीची भूमिका साकारली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना पंडित यांची एन्ट्री झाली आहे.
सध्या 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत रंजक वळण पाहायला मिळते आहे. ईश्वरीसोबत लग्न करण्यासाठी राकेश तिच्या वडिलांच्या जीवावर उठतो. तर राकेशचं ह सत्य ईश्वरीसमोर आणण्यासाठी अर्णव धडपड करतोय. तर दुसरीकडे लावण्या आणि अर्णवचं लग्न व्हावं यासाठी वल्लरी मोठा प्लॅन आखते. त्यामुळे या मालिकेत आता पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.