प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि भरतनाट्यम नृत्यांगना सुधा चंद्रन सध्या चर्चेत आहेत. जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी आयोजित केलेल्या 'माता की चौकी' कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याने त्यांना सावरणं कठीण झालं होतं. आता या संपूर्ण प्रकरणावर सुधा चंद्रन यांनी स्वतः प्रतिक्रिया देत त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा केला आहे.
सुधा चंद्रन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्या विशिष्ट अवस्थेत असताना नक्की काय घडत होतं, हे त्यांना स्वतःलाही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या, "मी असे म्हणणार नाही की प्रत्यक्ष देवी माझ्या शरीरात आली होती, कारण मानवी शरीर इतकी अफाट ऊर्जा सहन करू शकत नाही. मात्र, देवीचा एखादा अंश किंवा तिचा आशीर्वाद त्या क्षणी माझ्या पाठीशी असावा, असे मला वाटते. मी या गोष्टींवर नेहमीच विश्वास ठेवत आले आहे आणि माझ्या बाबतीत हे घडलं आहे."
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, भक्तीच्या तंद्रीत असताना त्यांनी अवघ्या ६ - ७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले होते. सुधा यांनी सांगितले की, त्यांच्या पतीने त्यांना नंतर ही माहिती दिली. त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. सोशल मीडियावर काहींनी "त्या नशेत होत्या" किंवा "न्यू इयर पार्टीचा हँगओव्हर आहे" अशा कमेंट्स केल्या होत्या. यावर बोलताना सुधा म्हणाल्या की, लोकांच्या अशा विचारसरणीचं मला हसू येतं. प्रत्येकाची स्वतःची श्रद्धा आणि मतं असतात.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सर्व रचलेले होते का? या प्रश्नावर सुधा चंद्रन यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. त्या म्हणाल्या, "हे सर्व करून मला काय मिळणार आहे? ज्यांना विश्वास ठेवायचा नाही, त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी मी इथे उभी नाही. कोणालाही माझ्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नाही. जर तुम्हाला विश्वास नसेल तर नका ठेवू, पण माझ्या परंपरांचा अपमान करू नका."
Web Summary : Sudha Chandran clarifies events at 'Mata ki Chowki' after viral video. She drank 4 liters of water in minutes, felt exhausted. She dismisses claims of being intoxicated, defending her faith.
Web Summary : वायरल वीडियो के बाद सुधा चंद्रन ने 'माता की चौकी' की घटनाओं पर सफाई दी। उन्होंने मिनटों में 4 लीटर पानी पिया, थकान महसूस हुई। उन्होंने नशे में होने के दावों को खारिज कर दिया, अपने विश्वास का बचाव किया।